अमरावतीत आदिवासी, शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप; शिवसेनेच्या ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेला दिली बळकटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदार विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती लोकसभा मतदारसंघातील बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा चिखलदरा, मेळघाट या विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागामध्ये ‘होऊ द्या चर्चा’ ही मोहीम राबवली गेली. यात दुर्गम भागातील शेतकरी आणि मेळघाटमधील आदिवासींनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करत भावनांना वाट करून दिली आणि शिवसेनेच्या मोहिमेला बळकटी दिली.

अमरावतीतील राज्य सरकारच्या योजनांचा चांगलाच समाचार आमदार विलास पोतनीस यांनी घेतला. ते म्हणाले, 2014 मध्ये नागरिकांच्या जीवनात सुखसोयी आणण्याचा मोठा गाजावाजा करून मोदी सरकार सत्तेत आले, परंतु सरकारच्या योजना म्हणजे फक्त बोलघेवडय़ा घोषणा ठरल्या आहेत. प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेल दरवाढ, घरगुती खाद्यपदार्थांच्या प्रचंड महागाईमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. फसलेली नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी वर्ग तसेच शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान,  शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आणावे, असे प्रतिपादन विलास पोतनीस यांनी केले.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, महिला जिल्हाप्रमुख वर्षा भोयर, ज्योती अवघड, सुनील डिके, विकास शेळके, तालुका संपर्कप्रमुख राजेश हजारे, विजय साटम, माजी शाखाप्रमुख जितेंद्र तरडे, महानगरप्रमुख पराग गुढधे, आशीष धर्माळे, उमेश घुरडे, संजय दुर्गे, योगेश साबळे, नीलेश सावळे, याया खान, अक्रम पठाण, नीलेश इंगोले, उमेश सेवक, माजी आमदार प्रदीप वडनेरे, सरपंच सचिन दहिकर, प्रकाश तेटू, विजय खंडारे, सुनील राऊत, अमोल लाड, युवासेनेचे शिवम पंचवटे, धीरज श्रीवास, सुमित राऊत उपस्थित होते.

मिंधे सरकार हितचिंतकांचे खिसे भरण्यात मग्न

महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आले. परंतु या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत तसेच आरोग्यवस्थेचा पुढचा बोजवारा उडाला असून मिंधे सरकार मात्र स्वतःच्या हितचिंतकांचे खिसे भरण्यात मग्न आहे.

उच्चशिक्षित आदिवासी तरुण बेरोजगार

मेळघाट विभागातील आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घेऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने रोजगार मिळण्यास अडचणी येत आहेत. सरकार नुसते ‘शासन आपल्या दारी’च्या पोकळ वल्गनाच करीत आहेत. पंतप्रधान आवास योजनेत शहरी विभागाच्या तुलनेत ग्रामीण विभागांना अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळत आहे. त्यामुळे ही योजना पूर्णपणे निरर्थक आहे, असे मत पोतनीस यांनी व्यक्त केले.

शेतकरी म्हणाले, शिवसेना, महाविकास आघाडीने वेदना जाणल्या

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धवजींनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये करण्याची योजना यशस्वीपणे राबवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीनेच जाणल्या, अशा भावना अमरावतीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Displaying IMG-20231004-WA0112.jpg

पथनाटय़ातून सरकारवर हल्लाबोल

‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेअंतर्गत विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या हस्ते ‘मुद्दे’ पथनाटय़ाचा शुभारंभ प्रभाग क्रमाक 148 व 155 मध्ये बुधवारी करण्यात आला. अणुशक्तीनगर, चेंबूर-सायन विधानसभा क्षेत्रात याचे 300 प्रयोग करण्यात येणार आहेत. यावेळी माजी नगरसेविका निधी शिंदे, माजी नगरसेवक श्रीकांत शेटये, विभाग संघटक संजय नटे, शिवसेना पदाधिकारी सुरेश लांडगे, प्रकाश जाधव, गणेश पाटील, प्रशांत म्हात्रे, महेंद्र नाकते, हेमकांत म्हात्रे, सचिन भोसले, रुक्मिणी भोसले, दक्षता पाताडे, छाया हमिदानी, किरण लोहार, विजय भोईर, निलेश गवळी, दीपेश चव्हाण, किरण जेधे आदी उपस्थित होते.

चंद्रपूरमध्ये सरकारविरोधात प्रकटला रोष

सरकारच्या फसव्या योजनांबद्दल पाच ठिकाणी ‘होऊ द्या चर्चा’ मोहीम राबवण्यात आली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधील वणी विधानसभेतील मुकुटबन, पाटण, माथार्जुन, मांडवी आणि अडेगावमध्ये शिवसेना उपनेते मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि संकल्पनेतून मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आणि मनमानी कारभाराविरोधात ‘होऊ द्या चर्चा’ हा उपक्रम राबवला जात असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य आपल्या मनातील रोष आणि संताप या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. चंद्रपूर विधानसभेतही पाच ठिकाणी ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपस्थित नागरिकांनीही आपली गाऱहाणी मांडत सरकारी योजनांचा कोणताही लाभ तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी जिल्हाप्रमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर, तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, युवासेना तालुकाप्रमुख नीलेश बेलेकार, उपतालुकाप्रमुख सीताराम पिंगे, युवासेना समन्वयक समीर लेनगुळे, युवासेना तालुकाप्रमुख आयुष ठाकरे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, झरी, मंगेश मोहितकर, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, झरी संदीप विंचू, पंचायत समिती सभापती, झरी प्राणिता घुगुल उपस्थित होते.

सरकार थापा मारून फसवणूक करतेय

केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांना केवळ मोठी आश्वासने देऊन आणि थापा मारून त्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका युवासेना कार्यकारिणी सदस्या शीतल शेठ-देवरुखकर यांनी केली. शिवसेनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या संयोजनाखाली तारदाळ, कबनूर, चंदूर व कोरोची येथे आयोजित ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेत त्या बोलत होत्या. यावेळी बाजारात सामान्यांनी सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, शिवाजी जाधव, दिनकर अनुसे, अक्षय शेट्टी, सूरज लाड, प्रशांत जगताप, सुनील नरदेकर, दीपक नरदेकर, रवी धनगर, भाऊसो तलवार, अजित कडाले, अशोक तोडकर, प्रताप चौगुले उपस्थित होते.

Displaying suresh patil (Vaibhav).JPG

खडकवासलात सरकारच्या योजनांचा पर्दाफाश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने, विभागीय समन्वयक रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, संपर्क संघटिका शालिनी देशपांडे, माजी महापौर व महिला संघटिका स्नेहल आंबेकर यांच्या सूचनेनुसार व खडकवासला संपर्कप्रमुख राजेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेत सरकारच्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यात आला.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, सहसंपर्क संघटिका स्वाती ढमाले, जिल्हा संघटिका संगीता पवळे, शहर संघटिका कल्पना थोरवे, युवासेना राज्य सहसचिव कुणाल धनवडे, विभागीय सचिव अविनाश बलकवडे, जिल्हा युवा अधिकारी सचिन पासलकर, विस्तारक अजिंक्य धात्रक, शहराधिकारी राम थरकुडे, युवती सेना शहर समन्वयक मृण्मयी लिमये, जिल्हा संघटक बुवा खाटपे, शहर संघटक संतोष गोपाळ, बापू निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, तालुकाप्रमुख तानाजी पवळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन वाघ, युवासेना तालुकाधिकारी आदित्य हवालदार, अभिजित तावरे उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारची खोटी आश्वासने, खोटय़ा बातम्यांचा व इंटरनेटवरील पेड प्रचाराची पोलखोल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8 चे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड नं. 127 मध्ये 12 ठिकाणी ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी शाखाप्रमुख संजय कदम, शाखा संघटिका स्मिता शिर्सेकर यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकही मोठय़ा संख्येने चर्चेत सहभागी झाले होते.

सांताक्रुझ, कुर्ल्यात सरकारी योजना आश्वासनांची पोलखोल 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाकर्त्या राज्य सरकारविरोधात थेट जनतेत उतरून कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ मोहिमेला सर्वसामान्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. वाढती महागाई, बेरोजगारी त्याचबरोबर निवडणुकीत दिलेली खोटी आश्वासने आणि योजनांची पोलखोल शिवसेनेने यावेळी केली.

कलिना विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या काच कंपाऊंड, वाकोला पाईपलाईन, सांताक्रुझ पूर्व, दत्त मंदिर रोड-वाकोला, पाटक टेक्निकल स्कूल-वाकोला ब्रिज आणि धोबीघाट-वाकोला या सांताक्रुझमधील विभागात तर कुर्ला पश्चिम येथील भारत सिनेमासमोर आज ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय पोतनीस यांनी सरकारी योजना, आश्वासनांची पोलखोल करून सर्वसामान्यांबरोबर संवाद साधला. यावेळी शिवसेना विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर, विभाग संघटक संजना मुणगेकर, विधानसभा संघटक हर्षदा परब, उपविभागप्रमुख बळीराम घाग, राजू परब, माजी नगरसेवक सगुण नाईक यांच्यासह शाखाप्रमुख, शाखा संघटक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.