
2018 साली प्रदर्शित झालेल्या नाळ चित्रपट चांगलाच गाजला होता. बाल कलाकार श्रीनिवास पोकळे याच्या चैतन्यच्या भूमिकेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. आता हा चैतन्य मोठा झाला असून पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार आहे. नागराज मंजुळे यांच्या नाळ-2 चा टीझर आज रिलीज झाला आहे.
या चित्रपटात दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री देविका दफ्तरदार, बाल कलाकार श्रीनिवास पोकळे यांच्या मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता नाळ 2 च्या निमित्ताने हे तिघे पुन्हा एकत्र आले आहेत. हा चित्रपट येत्या 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
































































