
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरमध्ये शाई फेकण्यात आली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. अजय मैनदर्गीकर असे त्या व्यक्तीचे नाव असून तो भीम आर्मीचा कार्यकर्ता आहे. राज्य शासनाने सरकारी नोकरीमध्ये सुरू केलेल्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
नुकतंच चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुण्याचं पालकमंत्रीपद काढून घेत त्यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते सोलापूरात आले होते.






























































