रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय मार्गावरील रुळांच्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-कल्याणदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर मध्यरात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या वेळेत मुंबईकडे येणाऱया एक्स्प्रेस गाडया कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तर मुंबईतून जाणाऱया मेल-एक्प्रएस गाडय़ा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. हार्बरवर सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 या वेळेत मानखुर्द ते नेरुळ अप-डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा गोरेगाव ते बोरिवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.