मंत्रालयाला टाळे ठोकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात पेटलेल्या मराठा आंदोलनाची ठिणगी आज मंत्रालयापर्यंत पोहोचली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अन्य पक्षांतील मराठा आमदारांनी थेट मंत्रालयाच्या मुख्य दरवाजालाच टाळे ठोकले. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा नाहीतर एकाही मंत्र्याला आत जाऊ देणार नाही अशी मागणी करत त्यांनी तिथेच पायऱयांवर ठिय्या मांडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत या आमदारांना ताब्यात घेऊन दरवाजा पुन्हा उघडला.

सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक सुरू असतानाच मंत्रालयात अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. 16 आमदार या आंदोलनात सहभागी होते. त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीच्या दरवाजाच्या हॅन्डलला साखळी गुंडाळून टाळे ठोकले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या आमदारांना गाडीत काsंबले. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार पैलास पाटील आणि राहुल पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे दिलीप बनकर, यशवंत माने, नीलेश लंके, अमोल मिटकरी, राजू नवघरे, चेतन तुपे, शेखर निकम, राजेश पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आजबे, विक्रम काळे, सुनील शेळके, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्राणी तर काँग्रेसचे मोहनराव उंबर्डे सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांच्या गाडीतूनच प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे पैलास पाटील म्हणाले, ’मराठा समाजाला सरसकट आरक्षण हवे आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. मराठा समाजाचा उद्रेक थांबवायचा असेल तर आरक्षणाचा निर्णय वेळेत व्हायला हवा. मात्र सरकार वेळकाढूपणा करीत आहे.’

आमदारांना चावीसकट गाडीत कोंल्याने धावाधाव

पोलिसांनी आंदोलनकर्त्या आमदारांना घाईघाईत गाडीत काsंबले आणि सुटलो बाबा म्हणत निःश्वास सोडला. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की दरवाजाला ठोकलेल्या टाळ्याची चावी मात्र आमदारांकडेच राहिली. त्यावर धावतधावतच पोलिसांनी पुन्हा गाडी गाठली आणि आमदारांना विनंती करत ती चावी मिळवली. त्यानंतरच त्यांना दरवाजा उघडता आला.