आमदार अपात्रतेची सुनावणी: अजित पवार गटाने मागितली एक महिन्याची मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदार अपात्रतेबाबत म्हणणे मांडण्यासाठी अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांकडून अपात्रतेसंदर्भात परस्परविरोधी याचिका दाखल करण्यात आल्या. याबाबत राष्ट्रवादीच्या 51 आमदारांना नार्वेकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याने कार्यवाहीला वेग आला आहे.

शरद पवार समर्थकांचे उत्तर सादर
शरद पवार समर्थक राष्ट्रवादीच्या 10 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस बजावण्यात आली होती. याबाबत त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलेले आहे. आम्ही कोणतीही शिस्त मोडलेली नाही, असे या उत्तराद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दोन्ही गटांकडून आमदार अशोक पवार, नवाब मलिक यांना नोटीस बजावलेली नाही.