कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज; सकाळी थंडी, दिवसा उकाडा मुंबईकर घामाघूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिनाभरापूर्वी पाऊस परतल्याची घोषणा केल्यानंतर आज हवामान विभागाने पुन्हा राज्यभरात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिह्यात विजांचा कडकडाट आणि  मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील काही भागांत सकाळी थंडी तर दिवसा तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे.

मुंबईसह राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. सरासरी तापमानात किमान 15 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी थंडी असली तरी दिवसा मोठय़ा प्रमाणात उकाडय़ात वाढ झाली आहे.

राज्यात काही ठिकाणी थंडीला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामामध्ये राज्यात पावसाची शक्यता असल्याने त्याचा फटका पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱयांना सतावू लागली आहे.