
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा मॉर्फ व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. मात्र आता या व्हिडीओचे सत्य समोर आले आहे. हा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून बनविण्यात आला होता. यावर सोमवारी महानायक अमिताभ बच्चन यांनी रश्मिकाच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. आता या व्हिडीओवर खुद्द रश्मिकाने मौन सोडले आहे.
रश्मिका मंदानाने सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहीलेय की, ” हा व्हिडीओ पाहून मी प्रचंड दुखावले गेले आहे, माझे डिपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर हा असा प्रकार माझ्यासाठी नाही तर माझ्यासारख्या प्रत्येकासाठी फार भयानक आहे. जे या तंत्रज्ञानामुळे धोक्यात आले आहे. पुढे तिने लिहीलेय, आज मी एक महिला आणि अभिनेत्री म्हणून माझे कुटुंब, मित्रमैत्रीणी आणि शुभचिंतक यांची आभारी आहे. जे माझ्यासोबत भक्कमपणे उभे आहेत, पाठिंबा देत आहेत. जर माझ्यासोबत हे शाळेत आणि क़ॉलेजमध्ये असताना असे काही घडले असते तर मी त्या परिस्थितीतून कशी बाहेर पडले असते. आपल्यापैकी अधिक लोकांना अशा बनावट गोष्टींचा फटका बसण्याआधी लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज आहे.”
व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला लिफ्टमधून येते आणि ती हुबेहुब ती रश्मिका दिसत होती. जिला एआयच्या माध्यमातून मॉर्फ करण्यात आले होते. रश्मिकाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती डिपनेक असलेल्या काळ्या रंगाच्या टाईट जीमवेअर घालून लिफ्टच्या आत येते. एका महिलेच्या चेहऱ्यालर एआयने डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने रश्मिकासारखे बनवले होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रश्मिकाने या व्हिडीओबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मिकाच्या या मॉर्फ व्हिडीओबाबत महानायक अमिताभ बच्चन यांनी तिच्या समर्थनार्थ उभे राहून तिला पाठिंबा दिला. शिवाय दोषिंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. एएलटी न्यूजचे पत्रकार अभिषेक यांनी आपल्या एक्स हॅण्डलवर हा फेक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिड़ीओसोबत त्यांनी फोटोओळीत लिहीले होते की, देशात डीपफेकशी लढण्यासाठी कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. तुम्ही रश्मिका मंदानाचा हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला असेल, मात्र हा व्हिडीओ जारा पटेल नावाच्या महिलेचा डिपफेक व्हिडीओ आहे.































































