
बँक कर्मचारी 13 दिवस संपावर जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 4 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीत विविध तारखांना हा संप करण्यात येणार आहे. या काळात देशातील विविध बँकांचे कर्मचारी संपावर जातील.
सर्व बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टाफची नियुक्ती करावी, बँकांमधील कायमस्वरूपी नोकऱयांचे आऊटसोर्सिंग बंद करावे आणि आऊटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन थांबवावे या मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने संपाचे हत्यार उपसले आहे.
– 4 डिसेंबर – पीएनबी, एसबीआय, पंजाब अॅण्ड सिंध बँक, 5 डिसेंबर- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया, 6 डिसेंबर- पॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 7 डिसेंबर- इंडियन बँक आणि युको बँक, 8 डिसेंबर- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र, 11 डिसेंबर- खासगी बँकांचा संप.
– 2 जानेवारी – तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमधील सर्व बँक कर्मचाऱयांचा संप; 3 जानेवारी – गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमधील सर्व बँकांमध्ये संप; 4 जानेवारी – राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सर्व बँकांमध्ये संप; 5 जानेवारी – दिल्ली, पंजाब, हरयाणा, जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यातील बँक कर्मचारी असतील संपावर; 6 जानेवारी
– पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम.



























































