
टीम इंडिया व ऑस्ट्रेलियाचा सामना सुरू असताना एक तरुण अचानक मैदानात घुसला. विराट कोहलीच्या अगदी जवळ जाऊन त्याने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले व नंतर त्याला चंदलेखा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलीस ठाण्यात नेत असताना प्रसारमाध्यमांनी त्याला काही प्रश्न विचारले त्यावेळी त्याने त्याचे नाव वेब जॉनसन असे सांगितले. तसेच तो ऑस्ट्रेलियाचा नागरिक असून विराट कोहलीला भेटायला तो मैदानात गेल्याचे त्याने म्हटले आहे.
या घटनेनंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सुरक्षाव्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जॉनसन हा एवढी कडक सुरक्षा व्यवस्था मोडून मैदानात पोहोचलाच कसा. तसेच तो विराट कोहलीपर्यंत पोहोचेपर्यंत सुरक्षा रक्षक काय करत होते असा सवाल केला जात आहे. मात्र या प्रकरणामुळे या स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका होत आहे.























































