रोहित ठरला सर्वाधिक धावा करणारा कर्णधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा नवा वर्ल्ड कप विक्रम रचलाय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहितने 31 चेंडूंत 47 धावांची खेळी केली. 11 सामन्यांत 597 धावांची लयलूट करून रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरलाय. रोहित शर्माने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉण्टिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच यांना मागे टाकले आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून केन विल्यमसनने 578 धावा केल्या होत्या. श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनेने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये 548 धावा केल्या होत्या. रिकी पॉण्टिंगने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून 539 रन्स केले होते. अॅरॉन फिंचने 2019च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून 507 धावा केल्या होत्या.