
जम्मू कश्मीरमधील राजौरी येथे दहशतवादी व जवान यांच्यात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत दोन अधिकाऱ्यांसह चार जवान शहीद झाले. अद्याप त्या ठिकाणी चकमक सुरू असून दोन जवान लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजौरी जिल्ह्यातील बाजीमाल भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यानंतर या भागात शोध कारवाई सुरू करण्यात आली होती. 19 नोव्हेंबरला पासून या भागात सुरू असलेली चकमक अद्याप सुरुच असून यात आतापर्यंत चार जवान शहीद झाले आहेत. राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन एम. व्ही. प्रांजल, स्पेशल पर्ह्सेसचे कॅप्टन शुभम गुप्ता, हवालदार माजिद अशी तीन जणांची नावं आहेत.
या चकमकीत एक मेजर देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


























































