
जर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्यात किंवा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर असता तर हिंदुस्थानचा संघ जिंकला असता, पण हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला गेला. हिंदुस्थानचा संघ सर्व सामने जिंकला, पण अंतिम सामन्यात काही पापी लोकांनी तिथे हजेरी लावल्यामुळे आपण सामना हरलो, अशी जळजळीत टीका तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. भगवा हा रंग त्यागी लोकांचा असतो, परंतु तुम्ही भोगी लोक आहात, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडले.






























































