
एम.पी.एफ.एस म्हणजेच महाराष्ट्र मंडळ दुबई, यंदा सुवर्णपर्व साजरे करत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकांकिका स्पर्धा होऊ शकली नाही, पण यंदा मात्र ही स्पर्धा म्हणजेच ‘सुवर्णपर्व एकांकिका करंडक 2023’ मंडळाच्या 50 व्या वर्षात जल्लोषात पार पडला. प्राथमिक फेरीत पूर्ण यूएईतून सहभागी झालेल्या 11 एकांकिका सादर झाल्या आणि त्यातून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक अशा विविध आशयाच्या अव्वल 6 एकांकिका अंतिम फेरी दाखल झाल्या. अंतिम फेरी जल्लोषात पार पडली. वैशिष्टय़ म्हणजे 11 पैकी 9 एकांकिका स्वलिखित होत्या. निलेश देशपांडे दिग्दर्शित आणि योगेश सोमण लिखित ‘श्री तशी सौ’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट एकांकिका, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री अशी सर्व पारितोषिक पटकावली. प्रकाश केळकर लिखित ‘अनुभूती’ने दुसरं तर अश्विनी धोमकर लिखित आणि दिग्दर्शित ‘वळण’ने तिसरं पारितोषिक मिळवलं. प्रेक्षकांची निवड असणारी सर्वोत्कृष्ट एकांकिका ‘चक्रव्यूह’ ठरली.
अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक राजेश देशपांडे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. भारताबाहेर राहूनसुद्धा या कलाविष्कारावर नुसतेच प्रेम नाही तर सादरीकरणात गाठलेल्या उंचीचे त्यांनी काwतुक केले.
यावेळी महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या ‘कला कार्यशाळे’त हरहुन्नरी रंगकर्मींनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत राजेश देशपांडे यांनी अभिनय, संवादफेक, उच्चार, देहबोली, सांघिक काwशल्य आणि नाटय़कलेसंदर्भातील विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले.






























































