राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल, जपानची आघाडीची खेळाडू नाओमी ओसाका व जर्मनीची अँजेलिक केर्बर यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत एकेरीमध्ये खेळणाऱया खेळाडूंची यादी गुरुवारी जाहीर झाली.

आगामी वर्षी 14 ते 28 जानेवारीदरम्यान मेलबर्न पार्क येथे ही स्पर्धा रंगणार आहे. सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि पोलंडची इगा स्विटेक हे अव्वल मानांकित खेळाडूदेखील यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील आकर्षण असणार आहे. द्वितीय मानांकित आर्यना सबालेंका आपले जेतेपद राखण्याच्या इराद्याने या स्पर्धेत उतरणार आहे. जोकोविचला तर ऑस्ट्रेलिया ओपनचे विक्रमी 11वे विजेतेपद यावेळी खुणावत आहे. कमरेच्या डाव्या बाजूवर शस्त्रक्रिया झाल्याने राफेल नदाल वर्षभर टेनिसच्या कोर्टपासून दूर होता. गतवर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱया फेरीतच नदालचा पराभव झाला होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो संपूर्ण सिझन टेनिसपासून दूर होता. नदालला यंदाच्या स्पर्धेत नववे मानांकन देण्यात आले आहे. 2019 ची विजेती नाओमी ओसाका व 2016ची विजेती अँजेलिक केर्बर यांना अनुक्रमे 46 व 31 वे मानांकन देण्यात आले आहे. दोघीही आई झाल्यानंतर प्रथमच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळणार आहेत.