‘स्टॉप क्लॉक’ची टिक टिक आजपासून; विंडीज-इंग्लंड टी-20 सामना ठरणार संस्मरणीय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन षटकांमधील वेळ कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ‘स्टॉप क्लॉक’चा नियम आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उद्या बुधवारी यजमान वेस्ट इंडीज व इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पहिल्या टी-20 सामन्यात ही ‘स्टॉप क्लॉक’च्या टिक टिकची ट्रायल घेतली जाणार आहे. त्यामुळे उभय संघांतील हा सामना खऱया अर्थाने संस्मरणीय
ठरणार आहे.

‘आयसीसी’ने या ‘स्टॉप क्लॉक’ नियमाच्या ट्रायलबद्दलची माहिती दिली. ‘स्टॉप क्लॉक’च्या नियमामुळे दोन षटकांमधील वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. या नियमानुसार गोलंदाजाला 60 सेपंदांच्या आधी गोलंदाजीसाठी यावे लागणार आहे. एका डावात तीन वेळा 60 सेपंदांच्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला 5 धावांची पेनल्टी बहाल करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणखी गतिमान करण्यासाठी आम्ही हा ‘स्टॉप क्लॉक’चा नियम करीत आहोत, अशी माहिती ‘आयसीसी’चे मुख्य व्यवस्थापक वसीम खान यांनी दिली. दोन षटकांमधील अंतर 60 सेपंदांहून अधिक वाढल्यास पाच धावांच्या पेनल्टीसह सर्कलच्या बाहेर केवळ चार क्षेत्ररक्षकच ठेवता येणार आहेत. ‘स्टॉप क्लॉक’च्या ट्रायलनंतर या नव्या नियमाचे सामन्यावर काय परिणाम झाले याबाबत समीक्षा करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.