
नारळ पाणी हे आरोग्य उत्तम राखण्यासाठी खूप मोलाची भूमिका बजावते. नारळ पाण्याचे फायदे बरेच आहेत. ऋतू कोणताही असला तरी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. आजारी माणसाला नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते, पोषण मिळतं आणि थकवा कमी होण्यास मदत होते. नारळपाणी पिण्याचे अन्य फायदे काय आहे ते पाहूयात.
त्वचा
नारळ पाणी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. नारळ पाण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास किंवा संतुलित राहण्यास मदत होते. शरीरातील पाण्याच्या पातळीचे प्रमाण कमी असले तर त्वचा निस्तेज, कोरडी होते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवल्यास त्वचा मुलायम आणि तुकतुकीत होते.
शरीरातील पाण्याची कमतरता
नारळाच्या पाण्यात आढळणारे इलेक्ट्रोलाइट्स, लॉरिक ऍसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. ज्यांना फार घाम येतो, अशांना येणारा थकवा नारळ पाण्यामुळे कमी होण्यास मदत होते.
पोटाच्या समस्यांसाठीही फायदेशीर
नारळपाणी प्यायल्याने पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. विशेषत: मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ निर्माण होते, अशावेळी नारळपाणी हे फायदेशीर ठरतं. नारळपाण्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते.
रक्तदाब
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दररोज नारळाच्या पाण्याचे सेवन करावे करणे फायदेशीर ठरते. नारळ पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि ‘फॅट’चे प्रमाण कमी झाल्याने बीपी हळूहळू सामान्य होण्.ास मदत होते.



























































