
विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई सरकारकडून सुरूच असून आज बुधवारी आणखी दोन खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आज निलंबित करण्यात आलेले दोन्ही खासदार हे केरळचे असून थॉमस चाझीकानद आणि ए. एम. आरिफ अशी या दोन खासदारांची नावे आहेत. चाझीकादन हे काँग्रेसचे, तर आरिफ हे सीपीएमचे खासदार आहेत. सभागृहात पोस्टर्स घेऊन प्रवेश केल्याच्या कारणावरून या दोन्ही खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत 143 विरोधी खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नव्या संसदेच्या सुरक्षेवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावे अशी मागणी विरोधकांनी आक्रमकपणे लावून धरल्याने कारवाई केली जात आहे.
























































