
अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर योगी सरकारने नवीन आदेश जारी केले आहेत. 22 जानेवारी रोजी शाळा आणि महाविद्यालयं तसंच दारूची दुकानं बंद राहणार आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मंदिराच्या विश्वस्त सदस्यांनी आपल्या मुलांची नावं हिंदू धर्मातील ग्रंथांवरून ठेवावीत असं आवाहन केलं आहे. तसंच, मुलांना आपल्या संस्कृतीचं शिक्षण देण्याविषयी आवाहनही त्यांनी केलं आहे.
विश्वस्त समितीचे सदस्य स्वामी विश्वप्रसन्न तीर्थ यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मंदिर निर्मितीहून अधिक मोठं कार्य त्याला संरक्षण देणं हे असल्याचं म्हटलं आहे. मंदिर निर्माण केल्यानंतरही आपली जबाबदारी संपणार नसून त्याला संरक्षण देणं हे अव्याहत काम असणार आहे, असं ते म्हणाले आहेत.






















































