साईबाबांना अर्धा किलो वजनाचा 29 लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डी या ठिकाणी कोट्यवधी भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात या ठिकाणी साईबाबांच्या चरणी भरभरून दान दिले जाते. सबका मालिक एक आणि श्रध्दा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात देश विदेशातील साई भक्त भरभरुन दान करतात. मंगळवारी बेंगळुरू येथील साईभक्ताने साईबाबांना तब्बल अर्धा किलो वजनी 29 लाख रूपयांचा सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. 504 ग्रॅम वजन असलेल्या या सुवर्ण मुकूटावर सुंदर नक्षीकाम केलेले असुन ते आकर्षण ठरत आहे.

शिर्डी या ठिकाणी कोट्यवधी भाविक हे येत असतात नुकत्याच झालेल्या नात्याच्या सुट्टीमध्ये सुमारे 16 कोटी रुपये दान स्वरूपामध्ये देवस्थानला मिळालेले आहेत अशा प्रकारे दान स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम देवस्थानकडे येत असते व देवस्थान वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मदतही करत असते. साईबाबांना भक्त भरभरून दान देत असतात रोख देणगीबरोबरच सोन्या चांदीचे मोठ्या प्रमाणात दान मिळत असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीत आलेल्या भक्तांनी 10 दिवसांत 16 कोटींचे दान दिलाय. आज बेंगळुरू येथील साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी 504 ग्रॅम वजनाचा 29 लाख रूपये किमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबांना अर्पण केलाय. साईमंदिराचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवले यांच्याकडे भक्ताने मुकूट सुपूर्द केल्यानंतर साईबाबांच्या मूर्तीवर तो चढवण्यात आला आहे. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांनी कोटा परिवाराचा साईबाबांची मूर्ती आणि शोल देऊन सत्कार केलाय.

साईबाबा मंदिरात येणारे भाविक बाबांच्या झोळीत भरभरुन दान देत असतात त्यामध्यें रोख रकमेसह सोने चांदी आणि विविध वस्तू स्वरूपात दान देतात. मागील महिन्यात टिव्हीएस कंपनीने साई संस्थानला सव्वा तीन लाखाची दुचाकी दान स्वरूपात दिली. त्यानंतर भुवनेश्वरच्या भक्ताने एक सुवर्णफूल अर्पण केलं आणि आता बंगलोरच्या कोटा परिवाराने 29 लाखांचे सुवर्ण मुकुट दान स्वरूपात दिला आहे.