
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना घोषित केल्यानंतर देशाभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सांगितलं की, ‘हे नाटक फार पूर्वीच लिहिलं गेलं होतं’ आणि जी प्रक्रिया पाहायला मिळाली ती केवळ ‘फार्स’ आहे.
X वरील एका पोस्टमध्ये सिब्बल म्हणाले, ‘स्पीकरने (ट्रिब्युनल म्हणून) शिंदे गटाला शिवसेना म्हटलं आहे. नाटकाची स्क्रीप्ट फार पूर्वीपासून तयार झाली होती. आम्ही विनापरवाना चाललेला फार्स पाहतो आहोत. हीच या ‘लोकशाहीच्या माते’ची शोकांतिका आहे’, असे माजी केंद्रीय मंत्री म्हणाले.
Speaker (as Tribunal) :
Shindes faction is real Sena
The play was scripted long ago
We watch the farce being played out with no recourse
That is the tragedy of this ‘mother of democracy’
— Kapil Sibal (@KapilSibal) January 11, 2024
2022 मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेच्या गटांनी केलेल्या क्रॉस-पिटिशन्सवरील बहुप्रतीक्षित निर्णयाच्या मुख्य मुद्द्यांचे 105 मिनिटांचे वाचन करताना, नार्वेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची ‘शिंदे यांच्यासह सत्ताधारी गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवावे’ ही याचिका फेटाळली.

























































