
उपनगरीय मार्गावरील रेल्वे रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण पाचव्या सहाव्या मार्गिकेवर शनिवार-रविवारी मध्यरात्री ब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याणदरम्यान पाचव्या-सहाव्या अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.40 ते रविवारी पहाटे 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सहाव्या मार्गावर धावणाऱया अप एक्प्रेस गाडय़ा कल्याण-विद्याविहारदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.




























































