
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक मिश्कील बाजू मंगळवेढ्यातील एका सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाली. मंगळवेढा येथे सुशीलकुमार शिंदे यांचे जुने सहकारी आणि मित्र शिवाजीराव काळुंगे यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा शुक्रवार 19 जानेवारी रोजी पार पडला.
या सोहळ्यावेळी शरद पवारही उपस्थित होते. सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मित्राची फिरकी घेतली. त्यांनी काळुंगे यांच्या पत्नीकडे पाहत तुमचा प्रेमविवाह झाला का असा सवाल केला. त्यावर शरद पवार यांनी त्यावर सिक्सर हाणत शिंदेंचीच फिरकी घेतली. शिंदेंना त्यांच्या प्रेमविवावाहाची काळजी का असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला.
वास्तविक शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे भिन्न पक्षात असले तरी त्यांच्यात 40 वर्षांत त्यांच्यात गुरुशिष्याचं नातं आहे. मात्र, आपलं राजकीय आयुष्य वेगळं ठेवून ते दोघंही एकमेकांशी अत्यंत मोकळेपणाने वावरताना दिसतात. एकमेकांची फिरकी घेताना दिसतात. मंगळवेढ्याच्या प्रसंगाने त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली.




























































