‘मेड इन इंडिया’ आयफोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात आयफोन उत्पादन सुरू करण्यासाठी टाटा कंपनी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. कम्प्टीशन कमिशन ऑफ इंडियाने टाटा- विस्ट्रॉनच्या कराराला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षभरापासून हा व्यवहार सुरू आहे. त्यामुळे आपल्या देशात आयफोन उत्पादनाला चालना मिळून प्रत्येकाच्या हातात मेड इन इंडिया आयफोन आल्यास आश्चर्य वाटायला नको.

विस्ट्रॉन कंपनीच्या बंगळुरूजवळील एका प्लॅण्टमध्ये आयफोनचे असेम्ब्लिंग होते. विस्ट्रॉनचा हा प्लॅण्ट आयफोन 14 मॉडेलच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. या प्लॅण्टमध्ये सध्या 10 हजारांहून अधिक कामगार आहेत. हा प्लॅण्ट खरेदी करण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स इच्छुक आहे. ऍपल उत्पादनाचा हा देशातील एकमेव प्लॅण्ट आहे.

विस्ट्रॉन तैवानची कंपनी असून तिने हिंदुस्थानात ‘ऍपल’साठी आयफोनचे उत्पादन सुरू केले.