पंतप्रधान मोदींचा स्वभाव राक्षसी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काशी विश्वनाथ मंदिर मुक्त करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेच्या अध्यक्ष पदावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मला हटवण्यास सांगितले. त्यामुळे मोदींचा राक्षसी स्वभाव उघड झाला आहे, अशा शब्दांत भाजपा नेते, माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. एक्सवरून त्यांनी मोदी यांच्याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. राम मंदिर प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात होते तेव्हादेखील मोदी असेच वागले होते, असा आरोपही त्यांनी केला.