शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मोदी सरकारने लटकवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावल्यानंतर शिवडीच्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला चालना दिली. पण या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी देण्याचे अधिकार मुंबई पोर्ट ट्रस्टला नाहीत असे पेंद्राने राज्य सरकारला कळवले आहे. त्यामुळे शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करणे सध्या शक्य नसल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाने राज्य सरकारला कळवले आहे. पेंद्राच्या धोरणामुळे या चाळींचा पुनर्विकास लटकल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडी सरकारने नायगाव, ना. म. जोशी मार्ग, वरळी व शिवडी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली तसेच बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या विकास नियंत्रण नियमावली 33 (9)मध्ये शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा समावेश केला.

शिवडी येथे बारा बीडीडी चाळी असून या चाळींमध्ये 960 खोल्या आहेत. त्यामध्ये 46 अनिवासी गाळे आहेत. तसेच 106 झोपडय़ा, 49 दुकाने, चार सामाजिक सुविधा बांधकामे व सहा धार्मिक स्थळे आहेत.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर

मात्र शिवडी येथील बीडीडी चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने या चाळींचा पुनर्विकास प्रस्तावात समावेश करण्यासाठी पेंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यास या चाळींचा पुनर्विकास करता येईल, असे राज्य सरकारच्या प्रस्तावात नमूद केले आहे.

त्यामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात म्हाडाने सर्वांगीण सुसाध्यता अहवाल (फिजिब्लिटी रिपोर्ट) सादर करावा असे या बैठकीत ठरवण्यात आले.

फिजिब्लिटी रिपोर्टला मान्यता

या बैठकीनंतर म्हाडाने जी. डी. सांभारे अॅण्ड पंपनी या आर्किटेस्ट पंपनीची नियुक्ती केली. या पंपनीने प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करून राज्य सरकारच्या हायपॉवर कमिटीमध्ये सादरीकरणही केले होते. हायपॉवर कमिटीने सुसाध्यता अहवालाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पाठवण्यात आला. त्यानंतर या प्रकल्पाबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनच्या उपस्थितीत म्हाडाच्या संयुक्त बैठकाही झाल्या. या सर्व बैठकीत पुनर्विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली.

मुंबई पोर्ट ट्रस्टवर जबाबदारी

त्यानंतर पुनर्विकासाचा सुसाध्यता अहवाल पेंद्र सरकारला सादर करण्याची जबाबदारी मुंबई पोर्ट ट्रस्टवर सोपवण्यात आली. पेंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर शिवडीच्या बीडीडी चाळींची जमीन राज्य सरकारला पर्यायाने म्हाडाला हस्तांतरित करण्याची जबाबदारी मुंबई पोर्ट ट्रस्टवर सोपवण्यात आली. म्हाडाने यासंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पाठपुरावा केला.

पुन्हा पेंद्राकडे पाठपुरावा

त्यामुळे सध्या हा पुनर्विकास रखडला आहे. पण यासंदर्भात राज्य सरकारची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी पेंद्र सरकारच्या बंदर व नौकानयन मंत्रालयासोबत पुन्हा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टला अधिकार नाहीत

मुंबई पोर्ट ट्रस्टने यासंदर्भात पेंद्र सरकारडे पाठपुरावा केला. पण पेंद्रीय नौकानयन मंत्रालयाने मुंबई पोर्ट ट्रस्टला पत्र पाठवले आणि सध्याच्या धोरणात शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यास मंजुरी देण्याचे अधिकार मुंबई पोर्ट ट्रस्टला नाहीत असे स्पष्टपणे नमूद केले आहे. पेंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे हे पत्र आल्यानंतर मुंबई पोर्ट प्राधिकरणाने राज्य सरकाराला पत्र पाठवले आणि शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करणे सद्यस्थितीत शक्य होणार नाही असे स्पष्ट करून टाकले आहे.