सोने 67000 रुपये तोळा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलीच झळाळी मिळाल्याचे दिसत आहे. सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर प्रती 10 ग्रॅम तब्बल 67,700 रुपयांच्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. जागतिक बाजारात अमेरिकन बँकांनी आपले व्याज दर घटविल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून सोन्याची मागणी प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, सोन्याचे दरही वाढले असून त्यात आणखी वाढ होईल, असा अंदाज आहे.

– फेब्रुवारी 2024च्या चौथ्या आठवडय़ात सोन्याचे दर 62 हजार रुपयांच्या आसपास होते. त्यानंतर आता सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 5 हजार रुपयांनी वाढला असून किंमत 67 हजार रुपयांच्याही पुढे गेली आहे. मुंबईत सोन्याचा दर 66,270 रुपये प्रति तोळा, दिल्लीत 66410 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 67 हजार रुपयांहून अधिक झाला आहे.

– लग्नसराईचा मोसम असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या गरजांप्रमाणे सोने खरेदी करत आहे. परंतु सध्या सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्यामुळे सरकारने दर परवडतील इतके राहातील याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.