
पुणे जिह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. यातील बारामती लोकसभा संघामध्ये 7 मे रोजी मतदान होईल, तर त्यानंतर तब्बल सहा दिवसांनंतर 13 मे रोजी उर्वरित पुणे, शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने एका जिह्यातील मतदार संघामध्ये अशी फोड करून दोन टप्पे का पाडले याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सर्वसाधारणपणे पुणे जिह्यातील सर्व मतदारसंघातील मतदान हे एकाच टप्प्यामध्ये होते. परंतु यावेळी बारामती मतदारसंघाचा एकमेव टप्पा हा अगोदर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने असे टप्पे नेमके कोणत्या निकषावर आणि सूत्राच्या आधारे ठरवले याबद्दल स्पष्टता नाही. परंतु राजकीय वर्तुळामध्ये मात्र बारामतीची निवडणूक अगोदरच्या टप्प्यात घेण्याचे कारण काय याची उत्सुकता आहे.



























































