भाजप-जेजेपीची युती का तुटली? दुष्यंत चौटाला यांनी सांगितले कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणात साडेचार वर्षे गोडीगुलाबीने संसार केल्यानंतर 12 मार्च रोजी भारतीय जनता पार्टी आणि जननायक जनता पार्टीची युती तुटली. ही युती का तुटली याबद्दल आता जेजेपीचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांनी 8 दिवसांनी मौन सोडले आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळेच युती तुटल्याचे कारण त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. त्यांच्या या विधानामुळे भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी हरयाणातही मित्रपक्षाला फसवल्याचेच उघड झाले आहे.

भाजपा-जेजेपीची युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला त्यानंतर नायब सिंह सैनी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. संध्याकाळपर्यंत नवीन मुख्यमंत्री आणि 5 पॅबिनेट मंत्र्यांनी शपथही घेतली. युती नेमकी कशामुळे तुटली याबद्दल उलटसुटल चर्चा सुरु होत्या. त्यामुळे 8 दिवसांनंतर अखेर युती तुटण्याचे कारण लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप असल्याचे दुष्यंत चौटाला यांनी सांगितले. युती तुटल्यानंतर कुणीही जेजेपी सोडली नाही, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढणार
जागावाटपावर एकमत न झाल्यामुळे भाजपा आणि जेजेपीची युती तुटली. मात्र, त्यानंतर कुणीही जेजेपी सोडली नाही. आगामी लोकसभा निवडणुक आणि त्यानंतर होणाया हरयाणा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकदीनीशी लढण्याचा निर्धार पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी केल्याचेही दुष्यंत चौटाला यांनी सांगितले.