
सिनेमा अगदी खरा वाटावा यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटीज प्रचंड मेहनत घेताना दिसतात. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमात रणदीप हुडा याने अशीच प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसले. बॉलीवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान यानेही ‘देवदास’ सिनेमाच्या वेळी अशीच मेहनत घेतली होती. सिनेमातील प्रसंग खरे वाटावेत यासाठी त्याने चक्क रम पिऊन शूटिंग केली होती. अभिनेते टिकू तलसानिया यांनीच याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत टिकू तलसानिया यांनी ‘देवदास’बद्दल सांगितले.




























































