गावदेवी क्रिकेटर्सचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्जुन लोटलीकरची (93 धावा) तडाखेबंद खेळी आणि जतीन जेठवाच्या (14 धावांत पाच विकेट) अचूक माऱयाच्या जोरावर गावदेवी क्रिकेटर्स संघाने एमसीए तिसऱया 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ग्रुप-1 सामन्यात मंगरूळ स्पोर्ट्स क्लबवर 112 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

भामा क्रिकेट क्लबने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गावदेवी क्रिकेटर्स मैदान, दहिसर येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत गावदेवी क्रिकेटर्सनी 35 षटकांत 5 बाद 232 धावा केल्या. अर्जुन लोटलीकरच्या भक्कम खेळीसोबतच अमित जैस्वालने  फलंदाजीत 67 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.