
एनसीबीने मुंबईत कारवाई करून 75 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी एनसीबीने दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
बोरिवली येथून एक जण ड्रग्ज तस्करी करणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीचे पथक बोरिवली येथे पोहचले. एनसीबीच्या अधिकाऱयाने एल. जी. खान नावाच्या एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मेफ्रेड्रॉन जप्त केले. एनसीबीच्या अधिकाऱयाने खानची चौकशी केली. त्याने त्याच्या चौकशीत यू. यू. नावाच्या हॅण्डलरचा खुलासा केला. खान हा माहीम येथे राहतो. एनसीबीचे पथक माहीम येथे गेले. माहीम परिसरातून यू. यू. खानला पकडले. अटक केलेले ते दोघे आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सक्रिय होते. एल. जी. खान हा ड्रग्ज पॅरिअर म्हणून ओळखला जातो.



























































