दहावी, बारावी निकालाच्या अफवांचा सुळसुळाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाच्या तारखांच्या अफवांचे पेव फुटले असून यामुळे शुक्रवारी दिवसभर विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या अफवांमुळे दहावी- बारावी परीक्षकांचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.

गेल्या काही दिवसांपासून निकालाबाबत समाज माध्यमांवर अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, बोर्डाकडून निकालाबाबत लवकरच अधिपृत घोषणा केली जाईल,असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

निकाल याच महिन्यात

बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवडय़ात जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे कोणीही निकालाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर बोर्डातर्फे ऑनलाईन निकालाची तारीख अधिपृपणे जाहीर केली जाणार आहे.