
ऑनलाईन नोंदणी केल्यावर लिव्ह-इन पद्धतीने जोडप्यांना राहाता येईल अशा संबंधांना औपचारिक मान्यता देण्यासाठी आणि नियमन करण्यासाठी तयार केलेल्या कायदेशीर चौकटीनुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास सहा महिन्यांच्या कwदेला जोडप्याला सामोरे जावे लागेल. नोंदणीत एखादी व्यक्ती 21 पेक्षा कमी वयाची आढळल्यास पोलिसांना आणि पालकांना कळवण्याची तरतूद या चौकटीत आहे.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी सरकारी कर्मचाऱयांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सगळ्यासाठी किमान वर्षभराचा अवधी लागणार आहे.
दंडाची तरतूद
लीव्ह इन संबंधांची नोंदणी तीस दिवसांच्या आत न केल्यास तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा 10 हजार दंड आकारण्यात येणार आहे. खोटी माहिती दिल्यास तीन महिने तुरुंग किंवा 25 हजार पर्यंत दंड आणि नोंदणी सूचनेचा पालन न केल्यास सहा महिने कैद किंवा 25 हजार दंडांची तरतूद या नियमावलीत आहे.
अपत्य आणि महिलांना संरक्षण
लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलांना यूसीसी कायद्यान्वये कायदेशीर वैधता मिळणार आहे. आणि अशा संबंधांतून जोडीदाराने सोडलेल्या निर्धन महिला सक्षम न्यायालयामार्फत त्या जोडीदाराकडे देखभाल निधीची मागणी करू शकतील.





























































