
घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरटयाने अंदाजे 26 लाख रुपयाचा ऐवज घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार तरुणी या मुलुंड येथे राहतात. त्याच्याकडे एक मोलकरीण घर कामाला येते. तीन दिवसापूर्वी तक्रारदार तरुणीचे कुटुंबीय गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा तक्रारदार तरुणी ही घरी एकटीच होती. शुक्रवारी तरुणी ही नेहमी प्रमाणे कामावर निघून गेली. कामावरून येण्यास उशीर झाल्याने ती तिच्या मैत्रिणीच्या घरीच राहिली होती. शनिवारी तरुणी घरी आली. तेव्हा तिच्या घराचा दरवाजा उघडा दिसला.




























































