
एअर इंडियाच्या काही देशांतर्गत उड्डाणांमध्ये आता वाय-फाय सुविधा अगदी विनामूल्य मिळणार आहे. त्यामुळे मोबाइल इंटरनेट सुरू ठेवता येईल. सध्या ही सेवा केवळ एअरबस ए350,बोइंग 787-9 आणि काही ए321नीयो या विमानांमध्ये उपलब्ध असेल. देशांतर्गत उड्डाणांमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवा देणारी एअर इंडिया देशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे.
इन-फ्लाइट वाय-फाय 10 हजार फुटांवर असताना एकाच वेळी अनेक उपकरणांना कनेक्ट होण्यास अनुमती देईल. ही सेवा सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि सरकारी निर्बंध यांसारख्या घटकांवर अवलंबून असेल. दरम्यान, आतापर्यंत एअरबस ए350, निवडक एअरबस ए341नीयो आणि बोइंग व787-9 विमानांमध्ये पायलट प्रोग्राम अंतर्गत आंतरराष्ट्रीय मार्गावर वाय-फाय सेवा दिली जात होती.