
दिल्लीत 40 वर्षीय कॅफे चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुनीत खुराना असे या बिझनेसमनचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्यांचे पत्नीसोबत फोनवर भांडण झाले होते. याबाबतची 16 मिनिटांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यानंतर पुनीत खुराना यांनी 59 मिनिटांचा व्हिडीओ शूट करत गळफास घेतला. अलीकडेच बंगळुरूत आत्महत्या करणाऱया अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रमाणेच पुनीत यांनीही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याचे उघड झाले होते.
पुनीत यांचा त्यांची पत्नी आणि बिझनेस पार्टनर असलेल्या मनिका जगदीश पाहवा यांच्याशी घटस्पह्टाचा खटला सुरू आहे. दोघे एकत्र कॅफे चालवत होते. दोघांच्या घटस्पह्टाची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी मॉडेल टाऊनच्या कल्याण विहारमध्ये आत्महत्या झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुनीत यांना रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पत्नी आणि सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप
पुनीत खुराना आणि मनिका जगदीश यांचे 2016 मध्ये लग्न झाले होते. पुनीतच्या कुटुंबीयांनी त्याची पत्नी आणि सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. पुनीतच्या आईने सांगितले की, लग्न झाल्यानतंर वर्षभर सगळ काही ठीक होते, परंतु नंतर वाद व्हायला लागले. त्याला पत्नीने प्रचंड त्रास दिला.