
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उरूसनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेर शरीफ दर्ग्याला दादर पाठवणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पेंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांच्याकडे पंतप्रधान औपचारिकरित्या चादर सुपूर्द करणार आहेत. दरम्यान, या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी दरवर्षी दर्ग्याला चादर पाठवतात.
पंतप्रधान पीक विमा योजना सुरूच राहणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱयांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानात आधारित पीक विमा योजना 2025-26 पर्यंत सुरूच ठेवण्याला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर खतांवर सवलत देण्याची योजनाही सुरूच ठेवण्यात येणार आहे. डीएपी खतांची 50 किलोग्रॅमची बॅग पूर्वीप्रमाणेच 1 हजार 350 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी 824.77 कोटी रुपयांची तरतूदही आगामी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दरम्यान, पॅबिनेटमध्ये हवामानाबद्दलची माहिती देणाऱया प्रकल्पासाठीही मंजुरी देण्यात आली. हा प्रकल्प नऊ राज्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.
मणिपुरात पुन्हा गोळीबार
इम्फाळ : मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिह्यातील एका गावात मंगळवारी रात्री काही बंदुकधाऱयांनी गोळीबार केला. उशिरा एक वाजण्याच्या सुमारास कडंगबंद परिसरात बॉम्ब फेकण्यात आले. गावकऱयांनीही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का जात नाहीत, असा सवाल केला आहे. तर उत्तर देताना मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळातही मणिपूरमध्ये अशांतता होती. ते कधी तिथे गेले होते का, असा सवाल केला.