
ज्येष्ठ कवी आणि लेखक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विलेपार्ले येथे ‘माझा मराठाची बोलू कौतुके’ (एक अभिजात संवाद) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम गुरुवार, 27 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर)मधील पु. ल. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब आणि ज्येष्ठ पत्रकार संजय सावंत उपस्थित राहणार आहेत. संकल्पना आणि संयोजन अभिजीत सावंत यांचे असून सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार आहेत. अवनि फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन डिचोलकर यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत केले जाणार आहे.































































