
‘महाशिवरात्री’निमित्त बुधवार, 26 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी असूनही वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. मात्र गुरुवार, 27 फेब्रुवारी उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते, मात्र बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय लोकांसाठी खुले ठेवले जाते तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.