वक्फ विधेयकात केंद्राची 14 बदलांना मान्यता

केंद्रीय मंत्रिमंडळाने वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली असून तब्बल 14 बदलांना मान्यता दिली आहे. हे विधेयक सरकार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सादर करू शकते. विरोधकांचा या विधेयकातील बदलांना विरोध असून अधिवेशनात प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता  आहे. दरम्यान, अधिवेशनाचे दुसरे सत्र 10 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान चालणार आहे.

संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाच्या आधारे वक्फ विधेयकाचा नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 13 फेब्रुवारी रोजी संसदेत वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवाल साद करण्यात आला, मात्र विरोधकांनी हा अहवालच बनावट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संसदेत प्रचंड गदारोळ झाला होता. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए खासदारांच्या 14 दुरुस्त्या जेपीसीच्या बैठकीत स्वीकारण्यात आल्या. यावेळी 44 सुधारणांवर चर्चा झाली.