
सध्याच्या घडीला अनेक मुली आणि महिलांमध्ये पाळी चुकण्याची समस्या ही अगदी सामान्य झालेली आहे. पाळी चुकल्यामुळे सर्व गणित बिघडून जाते. मूळातच महिन्याला येणारी पाळी, ही तीन किंवा चार महिन्यांनी येऊ लागली तर, शरीर निरोगी असण्याचे हे लक्षण नाही. फायब्राइडस् मुळे सुद्धा पाळी लांबण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काही वेळा मात्र शरीरातील छोट्या दोषांमुळे देखील पाळी लांबते. अनियमित पळी या समस्येवर आपण साधे सोपे उपाय करुनही पाळी नियमित सुरु होऊ शकते.

अनियमित पाळीवर घरी करु शकतो असे साधे सोपे उपाय
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरच्या घरी व्यायाम करायला सुरुवात करायला हवी. म्हणजे शरीरामध्ये चांगले बदल घडण्यास सुरुवात होऊ शकते.
आल्याचा वापर जेवणासह चहामध्ये अधिक करायला सुरुवात करा. आले हे केवळ सर्दीवरच नाही तर, अनियमित पाळी असणाऱ्यांसाठी सुद्धा वरदान आहे.
तीळाचा वापर योग्य प्रमाणात केल्यास, अनियमित पाळी येण्याचे प्रमाण खूप कमी होते.

दररोज एक खडा गूळाचा खाल्ल्यामुळे देखील पाळी रेग्युलर येण्याची सुरुवात होते.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी दालचिनी ही खूप महत्त्वाची आहे. दालचिनीच्या सेवनामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. दालचिनीचे पाणी रोज योग्य प्रमाणात पिल्यास, अनियमित पाळीच्या समस्येवर मात करता येते.
अननस हा अनियमित पाळी नियमित करण्यासाठी एक हमखास उपाय मानला जातो. अननसाच्या सेवनामुळे पाळी नियमित येण्यास मदत होते.
मासिक पाळी नियमित येण्यासाठी, कच्ची पपई हा पर्याय खूप उत्तम समजला जातो. पपईमध्ये कॅरोटीन नावाचे पोषकतत्व आहे, त्यामुळे हार्माोनल असंतुलन संतुलित होण्यास मदत होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)






























































