संभलच्या मशिदीची रंगरंगोटी सुरू

फोटो - प्रातिनिधिक

संभल येथील जामा मशिदीची आजपासून रंगरंगोटी सुरू करण्यात आली. हिंदुस्थानच्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सकाळी 9 वाजल्यापासून 10 मजुरांनी काम सुरू केले. सर्वात आधी मशिदीच्या बाहेरील भिंतींची साफसफाई करण्यात आली. त्यानतंर रंगरंगोटीच्या कामांना सुरुवात झाली. यावेळी हिंदुस्थानी पुरातत्व विभागाच्या पथकासोबतच मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, रंगरंगोटीला 10 दिवस लागू शकतात.