
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार गुरुवार 1 मे पासून देशातील 15 बँकाचे विलीनीकरण होणार आहे. या सर्व बँका ग्रामीण बँका असून देशातील बँकांची सेवा मजबूत व अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशातील ग्रामीण बँकाची संख्या 43 वरून 28 पर्यंत कमी होणार आहे.
या बँकांचे होणार विलीनीकरण
आंध्र प्रदेश – चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक, आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक.
उत्तर प्रदेश – बडोदा यूपी बँक, आर्यवर्त बँक, यूपी ग्रामीण बँक.
पश्चिम बंगाल – बंगिया ग्रामीण विकास बँक, पश्चिम बंगाल ग्रामीण बँक, उत्तर बंगाल आरआरबी
बिहार – दक्षिण बिहार ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक
गुजरात – बडोदा गुजरात ग्रामीण बँक, सौराष्ट्र ग्रामीण बँक आहे.
जम्मू आणि काश्मीर – ग्रामीण बँक ही जम्मू आणि काश्मीरमधील एक स्थानिक ग्रामीण बँक आहे.