
गेल्या सहा दिवसांत 786 पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात माघारी गेले असून यात दूतावासातील 55 कर्मचारी, अधिकारी तसेच पाकिस्तानी व्हीसावर आलेले आठ हिंदुस्थानी यांचा समावेश आहे. अटारी-वाघा बॉर्डरवर आज पाकिस्तानी आणि हिंदुस्थानी नागरिकांची गर्दी झाली होती, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. तर एकूण 1 हजार 465 हिंदुस्थानी नागरिक मायदेशी परतले. त्यात दूतावासातील 25 कर्मचारी आणि अधिकाऱयांचा समावेश आहे.