
देशभरात अमूलचे दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागले असून आज 1 मे पासून नवीन दर लागू होणार आहेत. तर मदर डेअरी आणि वेका& ब्रँडने दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ 29 एप्रिललाच केली आहे. आजपासून नव्या किमती लागू झाल्या. या वाढीनंतर मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत आता प्रति लिटर 69 रुपये इतकी झाली आहे तर टोन्ड दुधाची किंमत 54 रुपयांवरून 56 रुपये प्रति लिटरवर गेली आहे. गेल्या काही महिन्यांत प्रति लिटर किमतीत 4 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे.