उसाच्या एफआरपीत 15 रुपयांची वाढ

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत क्विंटलमागे 15 रुपयांची वाढ केली आहे. आता गाळप हंगाम 2025-26 साठी 10.25 टक्के साखर उताऱयासाठी क्विंटरला 355 रुपये एफआरपी मिळणार आहे. तसेच 9.5 टक्क्यांहून कमी उतारा असला तरी जास्त कपात न करता 239 रुपये एफआरपी देण्यात येईल, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.