
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांनंतर शेअर बाजारात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. टॅरिफ घोषणेनंतर जगभरातील शेअर बाजार भूईसपाट झाले होते. तसेच सोन्याच्या दर गगनाला भिडले होते. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजाराने गती पकडली. बँक निफ्टी ऑल टाईम हायवर पोहचला होता. तसेच सोन्याचे दरही विक्रमी पातळीवरून घसरले होते. मात्र, शेअर बाजार आणि सोन्याच्या दरात मोठे चढउतार होताना दिसत आहे.
शेअर बाजाराची मंगळवारी सुरुवात होताच बाजरात घसरण दिसून आली. सकाळी 10.30 वाजेपर्यंत निफ्टीमध्ये 88 तर बँकनिफ्टीमध्ये 350 अंकांची घरसण दिसून आली आहे. तसेच सोन्याचे दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. सोमवारी एका दिवसात सोन्याच्या दरात 2200 रुपयांनी वाढ झाली. तसेच चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. शेअर बाजाराने गेल्या काही आठवड्यात मोठी घोडदौड केली आहे. त्यामुळे आता थोडे करेक्शन येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच सोन्याच्या भावतही असेच चढउतार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जगभरातील आर्थिक अनिश्चिततेमुळे अनेक गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. अमेरिकेत, स्थिर व्याजदर आणि कमकुवत डॉलरमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानामुळे सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. चीन आणि फेड चेअरमन यांच्याबद्दलच्या त्यांच्या विधानांनंतर सोन्याच्या किमती अचानक घसरल्या. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 96730 रुपये आहे. तर एक दिवस आधी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 95510 रुपयांवर होता. सोन्याच्या किंमतीत एका दिवसात 2200 रुपयांची वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 93100 रुपयांवर व्यवहार करत आहे.
सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ होत आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर 93130० रुपये प्रति किलो आहे. एमसीएक्सवर चांदीच्या दरात 159 रुपयांनी कमी होत आहे. जागतिक अस्थिर वातावरणामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.