
लांब, जाड आणि रेशमी केस आपल्या सौंदर्यात अधिक भर घालतात. परंतु आजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात लोक त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. आपण घराबाहेर पडतो तेव्हा धूळ, घाण, सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा तसेच केस कोरडे आणि निर्जीव होतात. यामुळे आपले केस त्यांची चमक गमावतात आणि कोरडे आणि कुरळे दिसतात. केसांची चांगली काळजी घेण्यासाठी, केसांचा सीरम वापरला जातो. सीरममुळे केस मऊ, मुलायम आणि चमकदार होण्यास मदत मिळते. घरी सहज बनवता येणाऱ्या केसांच्या सीरमबद्दल जाणून घेऊ. बाजारात मिळणाऱ्या केसांच्या सीरममध्ये रसायने असतात आणि ती महागही असतात, पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही घरीही सहजपणे केसांचा सीरम बनवू शकतो.
केसांसाठी सीरम म्हणजे काय?
हेअर सीरम हा एक संरक्षक थर आहे जो केसांचे नुकसान होण्यापासून वाचवतो. कोरडे, निर्जीव केस मऊ, चमकदार आणि सुंदर बनवते. केसांचा सीरम केसांना तसेच टोकांना लावला जातो. केस धुतल्यानंतर सीरम लावण्याचे खूप सारे फायदे आहेत.
घरी केसांचा सीरम कसा बनवाल
घरी सीरम बनवण्यासाठी कोरफड जेल, गुलाबपाणी, नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरा. सर्वप्रथम, ब्लेंडरमध्ये कोरफड घाला आणि ते मिक्स करुन घ्या. त्यानंतर भांड्यात कोरफड जेल घाला, त्यात गुलाब पाणी, नारळ तेल आणि व्हिटॅमिन-ई तेल घाला आणि चांगले मिसळा. केसांना शाम्पू केल्यानंतर, हे हेअर सीरम ओल्या केसांवर लावा आणि केस सुकू द्या. तुम्हाला त्याचा परिणाम पहिल्यांदाच दिसेल. तुमचे केस पूर्वीपेक्षा अधिक रेशमी आणि चमकदार दिसतील.
केसांचे सीरम केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे केसांची वाढ देखील सुधारते आणि केस रेशमी आणि गुळगुळीत दिसतात. कांद्याच्या रसापासून केसांचा सीरम बनवण्यासाठी, कांद्याची पेस्ट बनवा, नंतर २ चमचे कांद्याचा रस २ चमचे ऑलिव्ह ऑइल आणि मधात मिसळा आणि केसांवर लावा. हे सीरम लावल्यानंतर, एक तासाने केस धुवा.
Hair Care- काळ्याभोर चमकदार केसांसाठी फक्त पाच रुपये करा खर्च! या घरगुती उपायांनी केस होतील घनदाट
नारळाच्या तेलापासून केसांचा सीरम बनवणे खूप सोपे आहे. याकरता नारळाच्या तेलात बदाम तेल मिसळा आणि नंतर त्यात थोडे पाणी घाला. हे हेअर सीरम स्वच्छ केसांवर लावा. यामुळे तुमच्या केसांची चमक कायम राहील आणि तुमचे केस पूर्वीपेक्षा निरोगी दिसतील.
नैसर्गिक सीरमचे फायदे
घरी बनवलेले हेअर सीरम केमिकल फ्री असते जे तुमच्या केसांना नुकसान करत नाही. हे लावल्याने केस रेशमी, चमकदार आणि गुळगुळीत दिसतात. त्यामुळे केसांची वाढही चांगली होते.