
‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) दिली. हिंदुस्थानने पाकिस्तानावर केलेल्या कारवाईचे समर्थन करत संघाचे राष्ट्रीय मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख सुनील आंबेकर यांनी ‘जय हिंद! भारत माता चिरंजीव!’ अशी प्रतिक्रिया ‘एक्स’ या समाजमाध्यमावर दिली. आरोग्य केंद्रांच्या नावाखाली दहशतवादी छावण्या सुरू असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर भारतीय हवाई दलाने ही कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले.